अंतरिम अर्थसंकल्प ; कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान….
अंतरिम अर्थसंकल्प ; 28/जुन रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या योजना तसेच शेतकऱ्यांसाठी काही घोषणा करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना काही सवलती तर काही घोषणा केल्या आहेत.
शेतकऱ्यांना विशेष काय घोषणा केल्या पाहुयात..
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नुकसान लक्षात घेता सरकारने हेक्टरी 5000 रुपयांचे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याची घोषणा केली आहे. या अनुदानासाठी शेतकऱ्यांना कोणत्या अटी शर्ती पुर्ण कराव्या लागतील याबाबत शासन निर्णय (GR) आल्यावर स्पष्ट होईल.
कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहिसा दिलासा देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला आहे असे फडणवीस यांनी सांगितले तर विरोधी पक्षांनी या अर्थसंकल्पावर मोठी टिका केली आहे.