आजचा हवामान अंदाज 13 जून ; पुढील 5 दिवस कसे राहिल राज्यातील हवामान
राज्यात मागील काही दिवसात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आसून काही शेतकऱ्यांच्या पेरण्याही झाल्या आहेत.. मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात ईन्ट्री केली आहे आणि पुढील 1-2 दिवसात विदर्भाचा संपूर्ण भाग व्यापून टाकन्याची शक्यता आहे.
राज्यात मात्र आता कालपासून पावसाने उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरन तयार होउन हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.पुढील 5 दिवस विदर्भातील जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आज 13 जून रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार तर अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.तसेच पुढील 5 दिवसासाठी विदर्भात पावसाचा यल्लो अलर्ट कायम आहे.
मान्सून यंदा वेळेवर महाराष्ट्रात दाखल झाला आसून काही ठिकाणी दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. मात्र कालपासून पावसाने उघडीप दिली आसून विदर्भ वगळता ईतर भागात पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणीच पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.