ऑगस्ट हवामान अंदाज ; ऑगस्ट मध्ये कमी पावसाचा अंदाज, चिंता वाढणार…
ऑगस्ट हवामान अंदाज ; हवामान खात्याचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी ऑगस्ट चा दिर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. संपूर्ण देशात मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. सरासरीच्या 106 % पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पूर्वोत्तर राज्ये, लगतच्या पूर्व भारतातील राज्ये, लडाख, सौराष्ट्र, कच्छ, मध्य आणि दक्षिण द्विपकल्पाचा तुरळक भाग वगळता देशात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता ऑगस्ट महिन्यात वाढवणार आहे. कारण ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. विशेषतः जूनपासून आतापर्यंत कमी पाऊस झालेल्या मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील काही भागात ऑगस्ट महिन्यातही पाऊस कमीच राहण्याची शक्यता आहे.
☔Rainfall averaged ovr entire country for #Aug2024 most likly normal (94-106 % of LPA)
☔Normal-above normal ovr many parts of country.
☔Below normal many areas in south parts of central & adj N peninsular India,NE & adj areas of E India,some parts of NW & S peninsular India. pic.twitter.com/6TqRftr1Rs— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 1, 2024
ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाचे चांगले पुरागमन होऊ शकते. कारण हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमधील पाऊस सरासरी पेक्षा जास्त असेल, असा अंदाज दिला. म्हणजेच ऑगस्टमध्ये कमी पाऊस राहीला तरी सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या एल-निनो ची सर्वसाधारण स्थिती आहे. मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्टिंग सिस्टमनुसार मॉन्सून हंगामात अखेरच्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ला निना स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. भारतीय समुद्रात इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी सर्वसाधारण स्थितीत आहे. उर्वरित मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे ऑगस्टनंतर पावसाला पोषक स्थिती राहण्याचे संकेत मिळत आहेत.
1stAug:पश्चिम बंगाल व लगतच्या दक्षिण बांगला देशवरच्या CYCIR च्या प्रभावाखाली पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता.पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा.येत्या 5 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा.विदर्भासह कोकण,मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतितीव्र हवामान pic.twitter.com/vDVorFx27j
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 1, 2024
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी ला-निना स्थिती चे संकेत असुन त्यामुळे सप्टेंबर मध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट मध्ये कोकण मध्य महाराष्ट्राचा काही भाग सोडता उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कमी असेल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर मध्ये जोरदार व चांगल्या पावसाचे पुनरागमन होईल.