कापूस सोयाबीनचे 5000 रूपये कधी मिळणार – (कापूस सोयाबीन भावांतर योजना)
कापूस सोयाबीन भावांतर योजना ; राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भावांतर योजनेची घोषणा केली होती. कापूस सोयाबीन च्या पडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. कापूस आणि सोयाबीन ची हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कापूस सोयाबीन साठी भावांतर योजनेची घोषणा केली होती.
कापूस सोयाबीन भावांतर योजनेची घोषणा लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी केली होती. आचारसंहिता लागल्यावर या योजनेची अंमलबजावणी करता नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी झाली नाही. लोकसभा निवडणुका पार पडल्यावर या योजनेची तातडीने अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा होती परंतु अद्याप या योजनेची सरकारकडून कोणतीही हालचाल केली नाही किंवा शासन निर्णय (GR) निर्गमित केला नाही.
हे वाचा – अजित पवार म्हणाले की तर…. लाडकी बहिण योजना बंद होणार पहा लाईव्ह
सध्या सरकार लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. परंतु सोयाबीन कापूस भावांतर योजनेची अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करत नाही. कापसाला भाव मिळत नसल्याने अजुन सुद्धा काही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन आणि कापूस घरात पडुन आहे.
आता 40 दिवसात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार आहे. सरकार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांना देणार का याबाबत अजुनही प्रश्नचिन्ह कायम आहे.
हे वाचा – लाडकी बहिण योजनेसाठी उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची गरज नाही हे कागदपत्रे जोडा
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी व परीस्थिती लक्षात घेता सरकारने हेक्टरी 5000 रुपयांचे अनुदानाची घोषणा केली आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रूपये दोन हेक्टर च्या मर्यादेत म्हणजे जास्तीत जास्त 10000 रूपये दिले जातील.या अनुदानासाठी काय अटी शर्ती असतील याबाबत शासन निर्णय आल्यावर खुलासा होईल. अर्थसंकल्पाबाबत सत्ताधारी पक्षाने शेतकरी हिताचे निर्णय घेतले असे सांगितले तर विरोधकांनी मतदारांना भुलवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न अशी टीका केली आहे…
भावांतर योजनेचे नवीन काही अपडेट आल्यावर आपल्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करू. शेतीविषयक नवनवीन माहिती, तज्ञांचे हवामानाचे अंदाज, सरकारी योजनाची माहिती, बाजारभाव व इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हा तसेच इतर शेतकरी मित्रांना आपल्या ग्रुपमध्ये सामिल करा… धन्यवाद….