खताचे भाव 2024 ; यंदा खताचे भाव किती ग्रेड नुसार खताच्या किंमती पहा..
खताचे भाव 2024 ; खरिप हंगामाची शेतकऱ्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे. खते बियाणांची खरेदी सुरू असून अनेक ठिकाणी खत विक्रेते शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन वाढिव दराने खताची विक्री केली जात आहे. तसेच विशेष ग्रेड च्या खतासोबत दुसरे खत घेण्यासाठी सक्ती केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी whatsaap नंबर ची सुविधा केली आहे. तक्रार केलेल्या शेतकऱ्यांचे नाव पुर्णपणे गोपनीय ठेवले जाणार आहे.
कृषी संचालक विकास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार खताच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मागील वर्षी प्रमाणेच यंदा सुद्धा खताचे दर राहतील असे सांगितले आहे. तसेच वाढिव दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अनेक ठिकाणी खताच्या किंमती वाढण्याच्या बातम्या आल्याने खत कंपनीने ग्रेड नुसार खताचे भाव जाहीर केले आहे. यापेक्षा अधिक दराने खताची विक्री होत असल्यास आपण कृषी विभागाकडे whatsap द्वारे तक्रार करू शकतो. खालील खताचे दर पहा..