नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार ; (NSMNY 4\’th instalment date)
नमो शेतकरी योजना ; पिएम किसान योजनेचा धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रूपये दिले जातात. पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांना मिळाला आहे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. या योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत अधिक जाणून घेऊया.
येत्या 24 जुन पासुन राज्यातील पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल व मुख्यमंत्री, कृषिमंत्री चौथा हप्ता कधी येणार याबाबत अधिकृत तारीख निश्चित करतील. सध्या या योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार…
नमो शेतकरी योजना ही पिएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली आहे. योजना सुरू होतानाच सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी pm-kisan योजनेचे लाभार्थी आहेत फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. जर तुम्हाला पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा मिळेल.
नमो शेतकरी योजनेचे तुमचे स्टेट्स चेक करण्यासाठी सरकारने नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे खालील स्टेप बाय स्टेप तुमचे स्टेट्स चेक करू शकता.
तुमचे स्टेट्स पाहण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम https://nsmny.mahait.org/ या संकेतस्थळावर जा. त्यानंतर स्टेट्स पाहण्यासाठी दोन पर्याय दिले आहे मोबाइल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर यातील कोणताही एक पर्याय निवडा. रजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय निवडला तर पिएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर नंबर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. रजिस्ट्रेशन नंबर टाका त्यानंतर Captcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा. शेवटी तुमच्या स्क्रीनवर शेतकऱ्याची सर्व माहिती येईल. तुम्हाला आता पर्यंत प्राप्त झालेल्या हप्त्याची ची माहिती मिळेल.