पंजाबराव डख म्हणतात आजपासून या भागात पावसाचा अंदाज ; या भागात जोरदार बरसणार…
पंजाबराव डख ; मराठवाड्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील बहुतांश भागातील शेतकरी पेरणीसाठी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दि. 22/ जुन रोजी डख यांनी नवीन अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार राज्यात 23/ जुन ते 30/जुन दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे.
डख यांच्या माहितीप्रमाणे विदर्भ, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागात 23/ जुन पासुन दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. ज्या ठिकाणी अजून पावसाअभावी पेरण्या झाल्या नाहीत तेथे पेरणी योग्य पाऊस पडेल. पेरणीसाठी एक इत ओल झाल्यावर पेरणी करण्यास हरकत नाही असे डख यांनी सांगितले आहे.
मान्सुनची बंगालची शाखा सक्रिय झाली असून राज्यात पुर्व विदर्भाकडुन पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत पाऊस मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात सक्रिय होईल. 30/जुन पर्यंत दररोज भाग बदलत पावसाचा अंदाज आहे.
पंजाबराव डख म्हणतात 26/जुन 27/जुन/ 28/जुन दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. यादरम्यान ठिक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. वातावरणात बदल झाल्यास मेसेज द्वारे कळवण्यात येईल असे डख यांनी सांगितले आहे..