पंजाब डख नवीन अंदाज एवढे दिवस सूर्यदर्शन पुन्हा पाऊस ; पंजाबराव डख
पंजाब डख ; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज वर्तवला आहे. कालपासून (29/जुलै) काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. ढगाळ वातावरण कायम असले तरी अर्ध्या तासाचे किंवा त्यापेक्षा कमी वेळाचे सूर्यदर्शन होत आहे. नवीन अंदाजात पंजाबराव डख काय म्हणतात पाहुया सविस्तर.
पंजाबराव डख म्हणतात दि. 05/ऑगस्टपर्यत नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक या पट्यात म्हणजेच मध्य भागापासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे.
तसेच मध्य भागापासून ते दक्षिण महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल परंतु ढगाळ वातावरण राहिल व अधुनमधून हलक्या सरी बरसतील. या भागात पुन्हा 02/ऑगस्ट पासून पावसाचा अंदाज आहे. या भागातील शेतकऱ्यांना फवारणी, खुरपणी करण्यासाठी पावसाची उघाड मिळेल असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. पुढचे दोन दिवस म्हणजे 30/जुलै आणि 31/जुलै हे दोन दिवस सूर्यदर्शन होईल – पंजाबराव डख
पंजाबराव डख यांनी सांगितलेले ठळक मुद्दे
1) मध्य भागापासून उत्तर महाराष्ट्रात 05/जुलैपर्यत पावसाचा अंदाज आहे.
2) मध्य भागापासून दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहिल पण सूर्यदर्शन होईल अधुनमधून हलक्या सरी येतील.
3) 30/जुलै आणि 31/ जुलै या दोन दिवसांत सूर्यदर्शन होईल
4) 05/जुलैनंतर पावस उघाड देईल.
दररोजचे हवामान अंदाज, शासकीय योजना ची माहिती, आणि इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या whatsaap ग्रुपमध्ये सामिल व्हा. धन्यवाद…