पाऊस वाढणार ; पुढील चार दिवस पावसाचा अंदाज या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट..
पाऊस वाढणार ; मान्सूने आठ दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार सुरूवात केली आहे. विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मान्सून सक्रिय झाला आहे. मान्सूनला पोषक हवामान नसल्याने मागिल आठवडाभर मान्सूनने विश्रांती घेतली होती. हवामान विभागाने पुढील चार दिवसांचा अंदाज वर्तवला असुन संपूर्ण महाराष्ट्रात यलो तर रत्नागिरी सातारा कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. (Weather forecast today)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील चार पाच दिवसांत दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. येथे दर्शविल्याप्रमाणे IMD द्वारे अतिवृष्टीचे अलर्ट जारी केले आहेत. मराठवाड्याच्या काही भागात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे (K.s.hosalikar)
दक्षिण कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे हवामान विभागाने विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी पुढील 24 ते 48 तासात राज्याच्या अंतर्गत भागात म्हणजे मध्य महाराष्ट्र मराठवाडा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.