पिएम किसान योजनेचे पैसे आले नाही येथे करा तक्रार (pm kisan news)
पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता दि. 18/ जुन रोजी वाराणसी येथील कार्यक्रमादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांना योजनेचा हप्ता मिळाला नाही ज्या शेतकऱ्यांना 17 वा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळवण्यासाठी पिएम किसान योजनेच्या अधिकृत ई-मेल वर तक्रार करता येणार आहे.
योजनेचा हप्ता मिळाला नाही तक्रार कुठे आणि कशी करावी…
ज्या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेच्या (pmkisan-ict@gov.in) या ई-मेल वर तक्रार करता येईल. किंवा 155261,1800115526 तसेच 011-23281092 या नंबर वर काॅल करून तक्रार करता येते. येथे तक्रार करून हप्ता न मिळाल्याची तक्रार नोंदवावी..
तुम्हाला योजनेचा 17 वा हप्ता का मिळाला नाही…
ज्या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्न असतो की हप्ता का मिळाला नाही. याचे कारण पाहण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. त्यानंतर होमपेजवर बेनीफिशरी स्टेट्स वर क्लिक करा. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका व कॅप्चा कोड टाका. गेट डाटा वर क्लिक करताच तुम्हाला हप्ता का मिळाला नाही याचे कारण दाखवले जाईल.
येथे जर तुमचे आधार लिंक किंवा ई-केवायसी नसल्याने जर हप्ता आला नाही असे दाखवले तर लवकर प्रलंबित असलेले काम पूर्ण करा.