पिकविमा योजना 2024 ; खरीप हंगामासाठी पिकविमा नोंदणी सुरू हि शेवटची तारीख…
पिकविमा योजना 2024 ; यंदा खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा भरण्यासाठी सुरुवात झाली आहे. मागील वर्षीप्रमाणेच पिकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हिस्स्याची रक्कम राज्य सरकारकडून भरली जाणार आहे. पिकविमा अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी लवकर CSC केंद्रात जाऊन पिकविमा नोंदणी करावी.
पिकविमा भरण्यासाठी 15 जून 2024 पासून सुरुवात झाली असून सध्या उपलब्ध माहिती प्रमाणे शेवटची तारीख 15 जुलै 2024 हि आहे. तरी शेवटच्या तारखेची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लवकर पिकविमा भरावा.
पिकविमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढिलप्रमाणे –
7/12 , 8A ,आधार कार्ड ,बँक पासबुक, पिक पेरा इत्यादी कागदपत्रांसह जवळच्या CSC केंद्रावर जा आणि पिकविमा नोंदणी पुर्ण करा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पासून पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी यासाठी हि योजना सुरू केली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, किडरोग, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी आर्थिक मदत दिली जाते.