प्रधानमंत्री पिकविमा नोंदणीसाठी फक्त एवढे दिवस बाकी – धनंजय मुंडे
प्रधानमंत्री पिकविमा ; प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत यंदा सुद्धा एक रुपयाच पिकविमा योजना राबविण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या अंदाजानुसार आतापर्यंत 01 कोटी 03 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पिकविमा नोंदणी पुर्ण केली आहे. खरिप पिकाची नोंदणी करण्यासाठी 15/जुलै हि शेवटची तारीख निश्चित केली आहे तरी आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा नोंदणी पुर्ण केली नाही त्यांनी लवकर विमा नोंदणी पुर्ण करावी.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामासाठी आजपर्यंत 01 कोटी 03 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी 01 रुपयात आपला पिकविमा भरून योजनेत सहभाग घेतला आहे. विमा भरण्यास आणखी 04 दिवसांचा अवधी शिल्लक आहे; तेव्हा उर्वरित सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांचा विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावा व आपले पीक संरक्षित करावे, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
पिकविमा नोंदणीसाठी मुदतवाढ मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अजून पिकविमा नोंदणी पुर्ण केली नाही. परंतु पिकविमा नोंदणीसाठी मुदतवाढ मिळेलच असे निश्चित नाही. पिकविमा नोंदणीसाठी आता 04 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे तरी लवकर पिकविमा नोंदणी पुर्ण करावी.