माणिकराव खुळे ; या आठवड्यात राज्यभरात पाऊस कसा राहिल…
माणिकराव खुळे ; मान्सूनने आता संपूर्ण राज्य व्यापले असले तरी सर्वत्र जोरदार व समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांना मोठ्या व जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. 24-जुन रोजी हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी राज्यातील आठवडाभराचा अंदाज वर्तवला आहे. पाहुया राज्यात आठवडाभर पावसाचे प्रमाण कसे राहिल.
मान्सूनच्या खंडानंतर राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होत असल्याने गडगडाटी किंवा पुर्वमोसमी पावसासारखे पावसाचे स्वरूप असेल असे खुळे यांनी सांगितले आहे. सह्याद्री घाटमाथ्यावर मान्सून हलक्या तिव्रतेने जाणवू लागला असल्याने जुन च्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.
विभागानिहाय पावसाचे प्रमाण कसे राहिल माणिकराव खुळे
कोकण मुंबईत 18/जुन पासुन पावसाने जोरदार हजेरी लावली आहे व या आठवड्यात सुद्धा मुंबई सह कोकणात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. आणि विदर्भात 20/जुन पासुन सक्रिय झालेला मान्सून बंगालची शाखा सक्रिय झाल्याने या आठवड्यात सुद्धा जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे.
मराठवाड्यात 26 जुन पर्यंत मध्यम हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच 27 ते 30 जुन दरम्यान संभाजी नगर वगळता सर्व जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
बंगालची शाखा सक्रिय झाल्याने अरबी समुद्राची शाखा उर्जितावस्थेत आली आहे त्यामुळे मान्सून एक किलोमीटरहून उंचीचा घाट चढून घाटमाथ्यावर वावरताना दिसतोय त्यामुळे खानदेश, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.
छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पूणे, नगर जिल्ह्यात या आठवड्यात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी राहिल असे खुळे यांनी सांगितले आहे.