मान्सूनचा अंदाज ; आज या सहा जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट – मुसळधार पावसाचा अंदाज

\"मान्सूनचा

मान्सूनचा अंदाज ; आज या सहा जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट – मुसळधार पावसाचा अंदाज…

 

मान्सूनच्या अंदाज ; राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला असून राज्यात बहुतांश भागात शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आज हवामान खात्याने राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच दिवसांचा अंदाज हवामान खात्याने राज्यातील हवामान कसे राहिल याबाबत अंदाज वर्तवला आहे. पाहूया हवामान खात्याचा अंदाज…(havaman aandaj today)

\"\"

 

आज 19 जुलै रोजी राज्यातील सहा जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग सातारा आणि विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्हे रेड अलर्टवर असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, तसेच विदर्भातील नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 18, 2024

 

आज मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली तसेच नगर, कोल्हापूर जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Weather forecast)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top