मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना तुमचा अर्ज मंजूर कि नामंजूर चेक करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ; सध्या सर्व राज्यभरात माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरणे सुरू आहेत. अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढणे, बॅंक खात्याच्या आधार लिंक करणे यासारखी कामे महिलांकडून मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच येणार असून 19/ऑगस्ट रोजी 3000 रूपये महिलांच्या आधार लिंक बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे.
तुम्ही लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज मंजूर कि नामंजूर हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. नारीशक्ती धुत या ॲप्लिकेशन द्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. तसेच अर्ज चुकल्यास एकदा अर्ज दुरुस्ती करता येईल. अर्ज भरला असल्यास तुम्ही तुमचा अर्ज मंजूर कि नामंजूर हे एकदा अवश्य चेक करा.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर कि नामंजूर हे चेक कसे करावे याबाबत अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.