मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा नवीन शासन निर्णय आला , या अटी रद्द मुख्यमंत्र्यांची घोषणा

\"मुख्यमंत्री

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा नवीन शासन निर्णय आला , या अटी रद्द मुख्यमंत्र्यांची घोषणा…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ; अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दर महिन्याला 1500 अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेत अनेक महिला अटी शर्ती मुळे अपात्र होणार असल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेतील काही जाचक अटी रद्द करण्याची घोषणा केली आहे.

लाडकी बहिण योजनेत अटी शर्ती मुळे लाखो महिला अपात्र होतील या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सात महत्त्वाच्या अटी रद्द केल्या आहेत.

लाडकी बहिन योजनेचा नवीन GR येथे पहा 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेतील या अटी रद्द केल्या आहेत..

🔴 महिलांना 21 ते 60 हि वयाची अट घातली होती आता हि वयाची अट 21 ते 65 पर्यंत वाढवली आहे.

🔵 एका कुटुंबात 05 एकापेक्षा जास्त जमीन असल्यास कुटुंबांतील महिला अपात्र होणार होत्या आता जमीनीची अट रद्द करण्यात आली आहे.

🟡 सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै एवढी होती यामध्ये वाढ करून आता 31 ऑगस्ट हि अर्जाची शेवटची तारीख केली आहे. अर्ज करण्यासाठी 2 महिने एवढा कालावधी असेल…

🔵 पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाही.

🟣 लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.

🟠 कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत महिलांनी 31/ऑगस्टपर्यत अर्ज केले तरीही त्यांना जुलै महिण्याचे पैसे दिले जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना सांगितले आहे. त्यामुळे ऑगस्ट मध्ये अर्ज केलेल्या महिलांना एकदाच 3000 रूपये त्यांच्या बॅक खात्यात जमा केले जातील.

\"\"

 

लाडकी बहिन योजनेचा नवीन GR येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top