युरिया डीएपी ची मागणी वाढली, राज्य सरकारचा मोठा निर्णय – अजित पवार

\"युरिया

युरिया डीएपी ची मागणी वाढली, राज्य सरकारचा मोठा निर्णय – अजित पवार

 

युरिया डीएपी ; मान्सून दाखल झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची पेरणीची तयारी जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या प्रमुख खतांपैकी युरिया आणि डीएपी या दोन खतांची मागणी वाढते. खताची मागणी वाढल्याने व्यापारी कृत्रिम टंचाई निर्माण करतात आणि शेतकऱ्यांची लूट होते. (Urea dap stock limits)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पार्शभुमीवर पणन महासंघासोबत बैठक घेतली असून या बैठकीत शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात खताचा पुरवठा करण्यात यावा आणि पणन महासंघासह इतर संघटनांनी खताचा संपूर्ण साठा हाती घ्यावा. आवश्यकता आणि उद्दिष्टानुसार खताचा साठ्याची उचल करावी. कृषी विभागाने पणन महासंघाला अधिक कोटा मंजूर करावा. (Fertilizer updates 2024)

हे वाचा – पिएम किसान योजनेच्या या लाभार्थ्यांना मिळणार 6000 रुपये पहा संपूर्ण माहिती

 

पणन महासंघाच्या विविध मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. पणन महासंघाने शेतकऱ्यांना खतांचा साठा उपलब्ध करून द्यावा आणि खतांचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Government scheme 2024)

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top