राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची शक्यता कमी हवामान खात्याचा अंदाज 

\"राज्याच्या

राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची शक्यता कमी हवामान खात्याचा अंदाज 

 

 

अरबी समुद्रात उंचीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत पूर्व आणि पश्चिम वाऱ्यांचा संगम झाल्यामुळे मुंबईजवळ पावसाचा जोर वाढलेला नाही. वेगवान वारे दक्षिण कोकण किनारपट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या किनारपट्टीवर ढग दाटून आले असून मुसळधार पाऊस पडत आहे.

 

सध्या सिंधुदुर्गच्या काही भागात हलके पावसाचे ढग आहेत, सिंधुदुर्ग आणि गोव्यात येत्या २४ तासांत जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

\"\"

मान्सूनचे वारे सध्या कमकुवत असल्याने त्याचा परिणाम राज्याच्या अंतर्गत भागात दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

आज हवामान खात्याने नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आणि जळगाव, नगर, सांगली, सोलापूर ध संपूर्ण मराठवाड्यात ग्रीन अलर्ट जारी केला आहे व हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top