रामचंद्र साबळे ; पावसाचा जोर कधीपर्यंत या भागात जोरदार ; ला-निना सक्रिय होतोय….
रामचंद्र साबळे ; जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी आज दि. 28/जुलै रोजी पुढील आठवड्याचा अंदाज वर्तवला आहे. साबळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार मंगळवार पर्यंत (30/जुलैपर्यंत) महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात 1000 हेक्टापास्कल तर मध्य भागापासून ते दक्षिण भागात 1002 हेक्टापास्कल एवढा हवेचा दाब राहिल. 30/जुलै पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून कोकणात मुसळधार पावसाचा जोर राहिल तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भात सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आहे..
31/जुलैपासुन (बुधवार) उत्तरेकडील भागात हवेचा दाब 1002 हेक्टापास्कल एवढा होईल व मध्य आणि दक्षिण भागात 1004 एवढा हवेचा दाब होईल व पावसाचा जोर कमी होईल. पावसाचा जोर 03/ऑगस्ट पर्यंत कमी होणार असून अधुनमधून मध्यम पावसाचा जोर राहिल.
यादरम्यान सांगली, सोलापूर, नगर, वर्धा, यवतमाळ, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी 24 ते 28 किमी एवढा असेल. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडुन राहिल त्यामुळे नैऋत्य मान्सूनचा प्रभाव कायम राहिल.
प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याचे तापमान 15 अंश ते 23 अंश सेल्सिअस इतके कमी झाले आहे. अल-निनो चा प्रभाव संपुष्टात आला असून ला-निना सक्रिय होत आहे. ला-निना चा प्रभाव वाढणार असल्याने पुढे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.
हे वाचा – जमिनीचा नकाशा कसा पहावा ऑनलाईन पद्धतीने (लांबी रुंदी सह जमिनीचा नकाशा)
Mp land record गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा आपल्या मोबाईल वर