रासायनिक खताचे भाव 2024 मध्ये काय आहेत, युरीयाची बँग किती रूपयांना ?
रासायनिक खताचे भाव वाढल्याची बातमी मागच्या काही दिवसात व्हायरल झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.मात्र रासायनिक खतांच्या भावात कसलाही बदल झालेला नाही अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
खतांचे भाववाढ झालेली नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोनताही आधार नसताना निव्वळ खोटी बातमी पसरवन्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र आता कृषी विभागाने खताची भाववाढ झाली नसल्याच सांगितलं आहे.
युरीयाची बँग किती रूपयांना मिळनार ?
पुर्वीप्रमानेच युरीयाची बँग 266 रूपयांनाच उपलब्ध होनार आहे तसेच ईतर खतंही मागील वर्षी च्या भावात शेतकऱ्यांना उपलब्ध होनार आहेत..
18:46:00 (DAP) – 1350
युरीया – 266
20:20:00:13 – 1250
24:24:00:08 – 1500
10:26:26 – 1470
पोट्याश – 1700
खतांचे भाव यापूर्वीच गगनाला भिडले आहेत. शेतमालाचे भाव जागेवरच आहे मात्र खते किटकनाशके महाग होत आहेत.यातंच यंदाही रासायनिक खतांचे भाव वाढल्याची बातमी समोर आली होती मात्र खताचे भाव वाढले नाहीत असे क्रुषी विभागाने स्पष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
खताचे भाव वाढले की एक गँझेट निघते,तसेच एक पत्र क्रुषी विभागालाही प्राप्त होते.परंतु अद्याप कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही त्यामुळे खतांचे भाव वाढलेले नाही. (सचिन गीरी – तालुका क्रुषी अधिकारी,अंबड)