रेशन कार्ड – नवीन सदस्याचे नाव लावा किंवा कमी करा मोबाईलवरुन आँनलाईन
Ration card ; रेशनकार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. स्वस्त धान्यासह विविध सरकारी योजनांच्या लाभासाठी याचा वापर केला जातो. नवीन सभासद नोंदणी करणे किंवा शिधापत्रिकेतील नाव कमी करणे ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. या लेखात आपण रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसे नोंदवायचे आणि नाव कसे कमी करायचे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे माहिती सविस्तर वाचा आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा…
विवाहित मुलीचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे नाव कमी करायचे आसेल किंवा जर तुम्हाला नवीन सून किंवा नवजात बाळाचे नाव जोडायचे असेल तर तुम्ही ते घरबसल्या ऑनलाईन करू शकता…तर रेशनकार्ड मधील हि दुरुस्ती कशी करायची पाहुयात सविस्तर…
रेशनकार्ड मध्ये नवीन नाव कसे Add करायचे/कसे काढायचे?
■ त्यासाठी https://rcms.mahafood.gov.in/ या वेबसाइटवर जा.
■ वेबसाइटवर आल्यानंतर, साइन इन/लाँगीन करा…
■ लॉग इन केल्यानंतर रेशनकार्ड दुरुस्ती (ration card modification) पर्यायावर क्लिक करा.
■ येथे तुम्ही तुमच्या शिधापत्रिकेवरील नाव दुरुस्त करू शकता/नवीन नाव जोडू शकता किंवा हटवू शकता…
खालील व्हिडीओ मध्ये सविस्तर माहिती दिली आहे, त्यामुळे प्रथम विडिओ सविस्तर पहा आणि नंतर पुढील प्रक्रिया करा… ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, धन्यवाद.