लाडका भाऊ योजना तरुणांना 10 हजार रुपये मिळणार शासन (GR) निर्णय पहा
लाडका भाऊ योजना ; पावसाळी अधिवेशनात जाहीर केल्यानुसार युवकांसाठी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. दरवर्षी राज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून व्यवसाय आणि नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. मात्र नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरुणांमधील बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर युवकांना शिक्षणानंतर प्रात्यक्षिक रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी सन २०२४/२५ या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत इच्छुक उमेदवार आणि रोजगार देणारे उद्योजक जोडले जातील आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना तसेच उद्योजकांना या योजनेचा लाभ मिळेल.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शासन निर्णय (GR) येथे पहा.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
🔵युवक 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावा.
🟣 उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान 12वी असावी.
🟠 अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
🔴 उमेदवाराने आधार नोंदणी करणे अनिवार्य आहे.
🟡 उमेदवाराकडे आधार लिंक केलेले बॅक खाते असावे.
🔵 उमेदवाराने कौशल्यपूर्ण रोजगार आणि उद्योजकता आयुक्तांच्या वेबसाइटवर नोंदणी केलेली असावी आणि रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देऊन नोकरी किंवा व्यवसाय मिळवण्याची क्षमता वाढवली जाईल. या सहा महिने प्रशिक्षण कालावधीत युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार दर महिन्याला खालील प्रमाणे वेतन दिले जाईल. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शासन निर्णय (GR) येथे पहा.