लाडकी बहिण योजना या तारखेपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात हि कागदपत्रे आवश्यक…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिलांना 01/जुलै पासून अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 15/जुलै हि आहे. या 15 दिवसाच्या कालावधीत लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करता येईल.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत..
1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
2) लाभार्थ्याचे आधार कार्ड.
3) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
4) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला.. (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य).
5) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
6) पासपोर्ट आकाराचा फोटो.
7) रेशनकार्ड.
8) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
या योजनेचा शासन निर्णय (GR) येथे पहा..