लाडकी बहिण योजनेअंतर्गत या महिला योजनेसाठी पात्र ; या महिला अपात्र…

\"लाडकी

लाडकी बहिण योजनेअंतर्गत या महिला योजनेसाठी पात्र ; या महिला अपात्र…

 

लाडकी बहिण योजना ; मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र असलेल्या महिलांसाठी दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे. 28/जुन रोजी या योजनेचा शासन निर्णय निर्गमित केला असून या योजनेत कोणत्या महिला पात्र आहेत तर कोणत्या महिला अपात्र आहेत याबाबत सविस्तर माहिती पाहुया.

 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी या महिला पात्र…

1) महिला हि महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असने आवश्यक आहे.

2) विवाहित, विधवा, घटस्फोटित, परीतक्त्या, आणि निराधार महिला योजनेसाठी पात्र असतील.

3) लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी महिलांचे वय 21 ते 60 यादरम्यान असावे.

4) लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी महिलांचे बॅंकेत खाते असने आवश्यक आहे..

5) महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा अधिक नसावे.

या योजनेचा शासन निर्णय (GR) येथे पहा..

 

या महिला योजनेच्या लाभासाठी अपात्र….

1) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

2) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.

(३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी अधिकारी संस्थेमध्ये कार्यरत
आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.

4) लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.

5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.

(६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या
बोर्ड / कॉर्पोरेशन/बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/ सदस्य आहेत.

7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.

8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

 

या योजनेचा शासन निर्णय (GR) येथे पहा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top