लाडकी बहिण योजनेचा लाभ कुटुंबांतील किती महिलांना घेता येणार…
लाडकी बहिण योजना ; राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अंतरीम अर्थसंकल्प मांडला असुन या अर्थसंकल्पात महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत अनेक प्रश्न महिलांना पडलेले आहेत यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहिण योजनेचा कुटुंबांतील किती महिलांना लाभ घेता येणार तरी याबाबत अधिक माहिती या लेखात जाणून घेऊया.
योजनेत केलेल्या बदलाची माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की एका कुटुंबांत दोन महिला असतील तर दोन्ही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबांतील एका अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे असे उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.
एका कुटुंबांतील दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच कुटुंबांतील एका अविवाहित महिलेला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेत खालील सात बदल करण्यात आले असून राज्य सरकारने महिलांना मोठे गिफ्ट दिले आहे.