लाडकी बहिण योजनेत मोठा बदल या अटी रद्द मुख्यमंत्र्यांची घोषणा…
लाडकी बहिण योजना ; अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दर महिन्याला 1500 अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेत अनेक महिला अटी शर्ती मुळे अपात्र होणार असल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेतील काही जाचक अटी रद्द करण्याची घोषणा केली आहे.
लाडकी बहिण योजनेत अटी शर्ती मुळे लाखो महिला अपात्र होतील या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून आज पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महत्त्वाच्या अटी रद्द केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेतील या अटी रद्द केल्या आहेत..
1) महिलांना 21 ते 60 हि वयाची अट घातली होती आता हि वयाची अट 21 ते 65 पर्यंत वाढवली आहे.
2) एका कुटुंबात 05 एकापेक्षा जास्त जमीन असल्यास कुटुंबांतील महिला अपात्र होणार होत्या आता जमीनीची अट रद्द करण्यात आली आहे.
वरील दोन्ही अटीमुळे अपात्र असलेल्या महिलांना आता योजनेत सहभागी होता येणार आहे. तसेच अर्ज करण्यासाठी कोणतीही अंतिम तारीख नसावी यासाठी विरोधी पक्षांकडून तसेच महिलांकडून मागणी केली जात आहे याबद्दल सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. तरी महिलांना मोठा दिलासा देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील दोन अटी रद्द केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केलेली घोषणा YouTube video पहा..