लाडकी बहिन योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही हि कागदपत्रे जोडावीत
लाडकी बहिण योजना ; अर्थसंकल्प (2024) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना जाहीर केली. या योजनेच्या शासन निर्णयानंतर महिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळवीची तयारी सुरू झाली. योजनेत जाचक अटी असल्याने महिलांच्या आणि विरोधी पक्षांनी केलेल्या मागणी नुसार योजनेतील अटी शिथिल केल्या असुन आता या योजनेचा सुधारित शासन निर्णय आला आहे.
नवीन (GR) शासन निर्णयानुसार महिलांना आता फक्त खालील चार कागदपत्रांची गरज आहे.
१) आधार कार्ड
२) कोणत्याही बँकेचे पासबुक
३) अधिवास प्रमाणपत्र किंवा १५ वर्षापूर्वी चे मतदार कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला (T.C.) किंवा जन्म प्रमाणपत्र.
४) उत्पन्नाचा प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही.
अर्ज करण्यासाठी फक्त वरील चार कागदपत्रांची गरज आहे. या चार कागदपत्रांशिवाय कोणत्याही कागदपत्रे आवश्यक नाहीत. या योजनेसाठी लवकरच एक नवीन पोर्टल उपलब्ध होईल आणि नवीन पोर्टल उपलब्ध होताच या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी पूर्ण करा. तुमच्या मोबाईलवर लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती पहा..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म घरबसल्या आपल्या मोबाईलवर कसा भरावा (संपूर्ण माहिती)
Mukhymantri mazi ladki bahin yojna online registration लाडकी बहिण योजनेचा फॉर्म कसा भरावा