शेतकरी कर्जमाफी ; शेतकरी कर्जमाफी बाबतीत मोठे अपडेट (महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी)

शेतकरी कर्जमाफी

शेतकरी कर्जमाफी ; शेतकरी कर्जमाफी बाबतीत मोठे अपडेट (महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी)

शेतकरी कर्जमाफी ; गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी, पिकावरील किडरोग तसेच दुष्काळ आणि सततच्या पावसामुळे शेती पिकाचे सतत नुकसान होत आहे. असे असताना शेती पिकाला अतिशय कमी दर मिळाल्याने शेतकरी पुर्णपणे आर्थिक दलदलीत फसला आहे. 2023 मध्ये दुष्काळ पडल्याने उत्पादनात मोठी घट झाली व कापूस आणि सोयाबीन अतिशय कमी दरात विकावे लागले आहे.

अजून 2023 मधिल पिक विमा, दुष्काळ मदत, इतर शासकीय अनुदान बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेले नाही. राज्याच्या अंतरीम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी मोठी अपेक्षा होती परंतु लाडकी बहिण योजना आणि लाडका भाऊ योजनेची वाहवा करताना शेतकऱ्यांवर अन्याय झालेला दिसत आहे.

राज्य सरकारने 2017 मध्ये एकदा आणि 2019 मध्ये एकदा कर्जमाफी दिली होती परंतु या कर्जमाफीतुन अनेक शेतकरी अटी शर्ती मुळे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित होते. या वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

हे वाचा – महाडीबीटी कृषी अवजारांची लाॅटरी यादी आली – यादीत नाव पहा

 

विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत आणि काँग्रेस पक्षाचे नेते नाना पाटोले यांनी सांगितले की आमचे सरकार आल्यास सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. तसेच अनेक शेतकरी संघटना कडून शेतकरी कर्जमाफीची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकार काय भूमिका घेणार हे पाहण्यासारखे असेल.

अनेक राज्यात कॉंग्रेसने कर्जमाफी देण्याचे वचन सरकार आल्यावर पाळले आहे. तसेच सत्ताधारी पक्षाचे नेते सुद्धा कर्जमाफी करण्याची मागणी करत आहेत त्यामुळे सरकार वर कर्जमाफी करणे हाच पर्याय शिल्लक दिसत आहे अन्यथा लोकसभा प्रमाणे विधानसभा मध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागु शकते.

सरकारने कर्जमाफी बाबत कोणत्याही निर्णय घेतल्यास त्याची सविस्तर माहिती आपण घेऊ तोपर्यंत आपल्या whatsaap ग्रुप मध्ये सामील व्हा. आणि हि माहिती ईतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा…

हे वाचा – डिएपी, 10-26-26 च्या नावाखाली विकली माती कंपनीवर गुन्हा दाखल

 

डिएपी, 10-26-26 च्या नावाखाली विकली माती या कंपनीवर गुन्हा दाखल…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top