शेतकरी कर्जमाफी होणार का ? सोशल मीडियावर चर्चाना उधाण
शेतकरी कर्जमाफी ; विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत आणि या विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्या कडे आकर्षित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना, तीन गॅस सिलेंडर मोफत, पाच वर्षे विज मोफत यासारख्या योजनेची सरकारने घोषणा केली आहे.
गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळून गेलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन अगदी कवडीमोल भावात विकले तेव्हा सरकारने या भाववाढीकडे लक्ष घालावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र सरकारने यामध्ये काही हस्तक्षेप केला नाही. दुष्काळ अनुदान, पिक विमा यासारख्या नूकसान भरपाई चे पैसे वेळेवर मिळाले नाही. तसेच शेतीसाठी आवश्यक खते औषधी च्या किमतीत दरवर्षी दरवाढ होत आहे या सर्व गोष्टींचा सत्ताधारी सरकार वर शेतकऱ्यांचा रोष आहे.
आपल्या सरकारवर शेतकऱ्यांचा रोष असल्याचे सत्ताधारी पक्षाला लोकसभा निवडणुकांमध्ये समजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच महिलांसाठी सरकार नवीन योजना सुरू करीत आहे. परंतु शेतकऱ्यांना आवश्यक असलेली कर्जमाफीची घोषणा सरकारने अद्याप केली नाही. सत्ताधारी पक्षाचे नेते अब्दुल सत्तार यांनी सुद्धा कर्जमाफी करण्याची मागणी केली होती.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु या शक्यतेला कोणताही आधार नाही. सरकारने कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केल्याचे मिडीया मध्ये सांगितले जात आहे. परंतु सरकारने किंवा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी कर्जमाफी करण्याची तयारी सुरु असल्याचे कुठेही बोलल्याचे दिसत नाही.
सरकार आचारसंहिता लागण्याच्या तोंडावर कर्जमाफीची घोषणा करू शकते परंतु हि घोषणा भावांतर योजनेप्रमाणे हवेत विरुन जाऊ शकते. निवडणूक निकाल लागल्यानंतर या घोषणेकडे सरकार पाहणार का यावर सुद्धा प्रश्न चिन्ह कायम आहे. तसेच जर सत्ता पालटली तर या कर्जमाफीच्या घोषणेला काही अर्थ राहत नाही.
कर्जमाफीची घोषणा किंवा आधारभूत माहिती आली तर आम्ही आपल्यापर्यंत नक्की पोहचु. सध्या कर्जमाफी बाबत कोणताही निर्णय, घोषणा केली नाही.