शेळीपालन योजना ; या जिल्ह्यासाठी 20-शेळ्या व 02-बोकड वाटपास मंजूरी
शेळीपालन योजना ; शेळीपालन व्यवसायाकडे शेतमजूर तसेच कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक जोड व्यवसाय म्हणून पाहिले जाते. शेळीपालन व्यवसायासाठी 50% पर्यंत सरकारी अनुदान मिळते. निवारा व चाऱ्यासाठी लहान शेत तसेच पडीक जमीन व चाऱ्यासाठी कुरण असल्यास शेळीपालन व्यवसाय सहज शक्य होते. 20-शेळी व 02-बोकड ही योजना कृषी, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत राबविण्यात येत आहे.
मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यासाठी 20-शेळ्या आणि 02- बोकड असा गट वाटपास शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत, सर्व प्रवर्गगातील लाभार्थ्यांना 50% बॅक-एंडेड सबसिडी दिली जाते आणि गट निर्मितीच्या पहिल्या सहा महिन्यांत 25% अनुदान आणि दुसऱ्या सहा महिन्यांत 25% अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास मान्यता दिली जाते.
जालना जिल्ह्यातील 1000 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून 2022/23 पर्यंत 449 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित 551 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे बाकी आहे. तसेच 2025-26 या कालावधीत 1000 गट वाटपास मंजूरी दिली आहे