सोयाबीन तननाशक ; उगवनपुर्व तननाशकाची फवारणी करतान हि काळजी तरंच मिळेल 100% रिझल्ट

\"सोयाबीन

सोयाबीन तननाशक ; उगवनपुर्व तननाशकाची फवारणी करतान हि काळजी तरंच मिळेल 100% रिझल्ट

 

सोयाबीनच्या शेतात गवत उगू नये यासाठी शेतकरी पेरणी केल्यानंतर 48 तासाच्या आत उगवनपुर्व तननाशकाची फवारणी करत आसतात. या उगवनपुर्व तननाशकाची फवारणी केल्यानंतर सोयाबीनच्या शेतात काही दिवस गवत उगवतच नाही.. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना खुप चांगला रिझल्ट मिळतो तर काही शेतकऱ्यांच्या शेतात फवारणी करूनही गवत उगते…

 

काही शेतकऱ्यांना उगवनपुर्व तननाशकाचा रिझल्ट कशामुळे येत नाही ? कोनते तननाशक चांगला रिझल्ट देते ? चांगल्या रिझल्टसाठी काय करावे ? याबाबत सविस्तर माहिती आपण या पोष्टमध्ये जानून घेनार आहोत…

स्ट्राँगआर्म (सोयाबीन पिक) हे उगवनपुर्व तननाशक कमी किमतीत आणि जबरदस्त रिझल्ट देतं. विषेशतः ईतर औषधापेक्षा कमी किमतीतही मिळते.. फक्त फवारणी करताना काही काळजी शेतकऱ्यांनी घेऩ आवश्यक आहे..

 

१) तननाशकाची एक एकरसाठी एक पुडी संपूर्ण वापरावी..(एका पुडीत जास्त क्षेत्र फवारणी केल्यास रिझल्ट चांगला येत नाही)

२) एक एकरसाठी 150 ते 200 लिटर पाण्यात औषध मिसळून फवारणी करावी…(कमी पाणी घेतल्यास चांगले रिझल्ट येत नाही)

3) तननाशकाची फवारणी करताना जमीनीच्या वरच्या थरात ओल असावी…(ओल चांगली आसेल तर चांगला रिझल्ट येतो)

4) फवारणी साठी साचलेले पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे….

 

5) अनेक शेतकरी पेरणी करताना ट्रँक्टरच्या सहाय्याने फवारणी करतात मात्र यामध्ये कमी पाणी वापरले जाते आणि त्यामुळे रिझल्टही कमीच मिळतो..

6) उगवनपुर्व तननाशकाची फवारणी केलेल्या शेतात खुरपणी/कोळपणी/डवरनी केल्यास तननाशकाचा लेयर/थर तुटतो आणि पुन्हा गवत उगायला लागते..

7) उगवनपुर्व तननाशकाची फवारणी करूनही शेतात गवत उगले आसेल तर पेरणी नंतर 18 ते 25 दिवसांत पुन्हा (उभ्या पिकात वापरल्या जानार्या) तननाशकाची फवारणी करू शकता..

8) उगवनपुर्व तननाशकाची फवारणी करताना ईतर कोनतीही औषधे मिक्स करू नका….

 

वरील मुद्दे लक्षात घेऊन योग्य पद्धतीने फवारणी केल्यास 100% रिझल्ट मिळतो. अनेक शेतकऱ्यांना परत गवत उपटने,खुरपणी, कोळपणी किंवा दुसऱ्या तननाशकाची फवारणी करायचीसुद्दा गरज पडत नाही त्यामुळे तननाशकाची फवारणी करताना वरील काळजी घेनं आवश्यक आहे.

हि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पुढे पाठवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा….

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top