हवामान अंदाज ; या भागात पावसाचा अंदाज ; जुलैमध्ये पाऊस कसा राहील पंजाबराव डख
हवामान अंदाज ; पंजाबराव डख यांनी दि. 26/जुन रोजी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजामध्ये विदर्भात मराठवाड्यात पाऊस कधी वाढेल तसेच जुलैमध्ये पावसाचा अंदाज कसा राहील याबाबत माहिती दिली आहे. पाहुया पंजाबराव डख यांनी दिलेला संपूर्ण हवामानाचा अंदाज. ( weather forecast today)
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार 27/जुन रोजी विदर्भात पावसाला सुरुवात होईल व 28,29 दरम्यान मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्र पाऊस व्यापेल. 30/जुन पासुन पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज असून 06/जुलै नंतर मोठ्या पावसाचा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. एकंदरीत आज दि. 27/जुन रोजी विदर्भातुन पावसाला सुरुवात होईल 27,28,29 हे तिन दिवस बहुतांश भागात पाऊस पडेल.
विदर्भ मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असुन अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जुलै मध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असुन पंजाबराव डख यांनी काहिसा शेतकऱ्यांना धिर दिला आहे.