13 मे हवामान अंदाज ; आज रात्री या जिल्ह्यात वादळी पाऊस…
राज्यात पुर्वमोसमी पाऊस सक्रिय झाला आसून ठिकठिकाणी वादळी वारे विजांसह पाऊस होत आहे. सोसाट्याचा वारा आणि गडगडाटासह पाऊस पुढील 4-5 दिवस राज्यात कायम राहन्याचा अंदाज IMD कडून देन्यात आला आहे…
आज पुढील काही तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात विजांसह आवकाळी पावसाचा आँरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा ईशारा देन्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक,अ.नगर, पुणे, सांगली, सातारा मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, छ.संभाजीनगर या जिल्ह्यात आवकाळी पावसाचा आँरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तर राज्यातील उर्वरित सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
यंदाचा मान्सून 19 मे रोजी बंगालच्या उपसागरात तसेच निकोबार बेटावर दाखल होन्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान तज्ञ के.एस होसाळीकर यांनी दिली आहे. 3-4 दिवस आधीच मान्सून दाखल होनार आसल्याचा अंदाज आसल्याने महाराष्ट्रात मान्सून कधी येईल याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे.