Ladki bahin yojna ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना वादाच्या भोवऱ्यात वित्त विभागाला चिंता…
Ladki bahin yojna ; महायुतीच्या सरकारने पावसाळी अधिवेशनात महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अधिवेशनात केलेल्या घोषणेमध्ये महत्त्वाची घोषणा म्हणजे (मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना) या योजनेची संपूर्ण राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गत 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरवर्षी 18000 रुपये दिले जाणार आहे.
लाडकी बहिण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली असुन योजनेवर होणाऱ्या खर्चाबाबत वित्त विभागाने चिंता व्यक्त केली आहे. या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर 46 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. महिला व बालकल्याण विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनेवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. आणि विशेष म्हणजे राज्यावर 7.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी होणारा खर्च पाहता राज्याची परिस्थिती योजना राबविण्यासाठी अनुकूल नसल्याने वित्त विभागाला खर्चाची चिंता व्यक्त केली आहे. राज्यांवरील असलेल्या 7.5 लाख कोटी रुपयांच्या कर्जाबद्दल तसेच योजनेसाठी दरवर्षी होणाऱ्या खर्चाचा 46 हजार कोटी रुपयांचा निधी बाबत अर्थ खात्यात चर्चा सुरू आहे.
अर्थ खात्याच्या अक्षेपानंतर सत्ताधारी नेते योजना कोणत्याही परिस्थितीत राबवण्यात येणार असल्याचे सांगतात. तसेच निवडणुकीनंतर योजना सुरू राहणार असल्याचे सांगतात.