लाडकी बहिण योजनेवर अर्थखात्याने घेतले आक्षेप ; खर्चा बद्दल अर्थ खात्याला चिंता

लाडकी बहिण योजनेवर

लाडकी बहिण योजनेवर अर्थखात्याने घेतले आक्षेप ; खर्चा बद्दल अर्थ खात्याला चिंता

लाडकी बहिण योजना ; पावसाळी अधिवेशनात अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. योजनेसाठी सध्या जोरदार अर्ज नोंदवले जात आहे. पात्र महिलांना दर महिन्याला 1500 याप्रमाणे 18000 रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र सरकारचे लाडकी बहिण योजनेवर दरवर्षी 46 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

अर्थ खात्याचे आक्षेप डावलुन लाडकी बहिण योजना सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. वित्त विभागाचे आक्षेप उघड झाल्याने योजनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योजनेचा 31/जुलै पर्यंत अर्ज दाखल केलेल्या महिलांना 19/ऑगस्ट रोजी म्हणजे रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर योजनेचा पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे मिळुन 3000 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती अजितदादा पवार यांनी दिली आहे.

वित्त विभागाने घेतलेले प्रमुख आक्षेप पुढील प्रमाणे…

1) लाडकी बहिण योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांचा निधी कसा आनणार?

2) राज्यावर आधिच 7.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याने लाडकी बहिण योजना राबवणे किती योग्य आहे?

3) महिलांसाठी सध्या अनेक योजना सुरू असताना या योजनेची व्यवहारता आढावा घेण्याची गरज..

4) योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चावर वित्त विभागाने ठेवले बोट.

5) अनेक महिला शासनाच्या योजनेच्या लाभ घेत असताना लाडकी बहिण योजनेच्या लाभ मिळण्याची शक्यता…

सत्ताधारी पक्षाचे नेते तसेच अजितदादा पवार यांनी योजना कोणत्याही परिस्थितीत सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार ?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे. (अजितदादा पवार)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top