पंजाब डख ; 05 ऑगस्ट पर्यंत या भागात पावसाचा जोर कायम राहणार panjab dakh live
पंजाब डख ; सध्या विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी वर जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 27/जुलै रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजात राज्यात 05 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पंजाबराव डख यांनी मुंबई संपूर्ण कोकणात उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भात 05/ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात रिमझिम पाऊस पडेल सध्या सार्वत्रिक व मोठ्या पावसाची शक्यता नाही असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. यादरम्यान उघाड पाहुन शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे पूर्ण करावी. कापूस सोयाबीन वर फवारणी करताना चांगल्या दर्जाचे स्टिकर टाकून फवारणी करावी. तसेच चांगल्या रिझल्ट साठी उघाड पाहुन फवारणी करावी असे डख यांनी सांगितले आहे.
05/ऑगस्ट पर्यंत विदर्भात उत्तर महाराष्ट्रात तसेच मुंबई आणि संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कायम राहिल व मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी बरसतील. (पंजाब डख हवामान अंदाज)