वित्त विभागाच्या अक्षेपानंतर अजित पवार काय म्हणतात ; लाडकी बहिण योजना…
वित्त विभाग ; पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. सदर योजनेच्या 46 हजार कोटी रुपयांचा वार्षिक खर्च पाहता वित्त विभागाने खर्चाबाबत चिंता व्यक्त केली होती. वित्त विभागाच्या अक्षेपानंतर अजित पवार यांनी ट्विटरवर द्वारे याबाबत खुलासा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिण योजनेसाठी चालू वर्षासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील माता भगिनी साठी दर महिन्याला 1500 रूपये याप्रमाणे वार्षिक 18000 रूपये दिले जाणार आहेत. त्याचा वापर आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांना होणार आहे.
योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपये खर्च करण्याची महाराष्ट्र सरकारची आहे. त्यामुळे योजनेला कोणाचा विरोध असन्याचे कारण नाही. अजित पवार यांनी हि माहिती आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.
अजित पवार यांनी ट्विटरवर केलेले महत्त्वाचे मुद्दे
🔴 वित्त आणि नियोजन, सर्व संबंधित विभाग, तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली.
🔵 चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक अशा संपूर्ण रकमेची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार, हा प्रश्नच उद्भवत नाही.
🟣 महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.