E-pik pahani ; पिकविमा नुकसान भरपाई साठी ई-पिक पाहणी करा…

E-pik pahani

E-pik pahani ; पिकविमा नुकसान भरपाई साठी ई-पिक पाहणी करा…

 

ई-पिक पाहणी ; आपल्या महाराष्ट्रात मागिल तीन वर्षापासून ॲन्ड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे ई-पिक पाहणी केली जात आहे. ई-पिक पाहणी च्या आधारे शेतकऱ्यांना पिकविमा, नुकसान भरपाई दिली जाते तसेच कर्जवाटप केले जाते. कोणत्याही शासकीय अनुदानासाठी ई-पिक पाहणी द्वारे केलेली नोंद अतिशय महत्त्वाची आहे.

01/ऑगस्ट पासून ई-पिक पाहणी करा..

भूमी अभिलेख कार्यालयाने 2021 पासून शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाची नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही. आपल्या शेतातून आपल्या पिकाची नोंद सातबारा वर करता येते. यंदा 01/ऑगस्ट 2024 ते 15/सप्टेंबर या 45 दिवसाच्या कालावधीत शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करता येणार आहे.

ई-पिक पाहणी चे नवीन वर्जन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

भूमी अभिलेखने ई-पिक पाहणी ॲप्लिकेशन अपडेट केले असून आता शेतकऱ्यांना 48 तासांत दुरुस्ती करता येणार आहे. विशेष म्हणजे जिओ फेंसिग या सुविधेमुळे पिकाचा फोटो बरोबर घेतला कि नाही हे ठरवता येणार आहे.

ई-पिक पाहणी ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर शेतकऱ्यांना आपल्या पिकाची माहिती भरल्यावर ई पिक पाहणी करता येते. ई पिक पाहणी या ऑनलाईन पद्धतीने कोणत्या राज्यात कोणते क्षेत्र किती आहे याची माहिती पाहणे सोपे झाले आहे. ई पिक पाहणी करण्यासाठी 01/ऑगस्ट पासून 15/सप्टेंबर पर्यंत कालावधी आहे.

अनेक शेतकरी नेटवर्क प्रॉब्लेम मुळे ई-पिक पाहणी करण्यासाठी दुर्लक्ष करतात परंतु ई-पिक पाहणी प्रत्येक शेतकऱ्यांना बंधनकारक आहे जर शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केली नाही तर त्या शेतकऱ्यांची जमीन पडीक धरली जाते आणि पिक विमा नुकसान भरपाई किंवा इतर कोणत्याची शासकीय अनुदानाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे नुकसान भरपाई आणि पिक विमा व इतर शासकीय अनुदान मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करावी..

 

ई-पिक पाहणी चे नवीन वर्जन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit indiankisann.com

Scroll to Top