Ladki bahin yojna app ; लाडकी बहिण योजनेचा अर्ज असा असेल तर होणार बाद….
Ladki bahin yojna app ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत. आतापर्यंत अनेक महिलांनी यासाठी अर्ज केले आहे. परंतु योजनेचे तीन चार शासन निर्णय आले असून प्रत्येक GR मध्ये वेगवेगळे बदल होत गेले आहेत. त्यामुळे अनेक महिलांनी घाईघाईने अर्ज केल्याने अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती नसल्याने चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे अपलोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लाडकी बहिण योजनेचा तुमचा अर्ज बरोबर आहे का हे तपासून पाहुन आपला अर्ज बरोबर आहे का नसेल तर अर्ज एकदा दुरुस्त करता येणार आहे. लाडकी बहिण योजनेचा अर्ज फक्त एकदाच दुरुस्त करता येतो. त्यामुळे अर्जात जे बदल करायचे असतील ते काळजीपूर्वक आणि व्यवस्थित करावेत.
कोणत्या पद्धतीने केलेले अर्ज बाद होऊ शकतात?
लाडकी बहिण योजनेचा अर्ज करताना कागदपत्रे अपलोड करतेवेळी आधार कार्ड आणि राशन कार्डच्या दोन्ही बाजु अपलोड करणे आवश्यक आहे जर तुम्ही एकच बाजू अपलोड केली असेल तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. जर तुम्ही सुद्धा आधार कार्ड आणि राशन कार्डच्या एकाच बाजुचा फोटो अपलोड केला असेल तर तुम्ही सुद्धा तुमचा अर्ज रद्द होण्याआधी दुरुस्त करून घ्या.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज रद्द होण्याआधी म्हणजे पेंडीगमध्ये असताना तुमचा अर्ज दुरुस्त करून घ्या. नारीशक्ती धुत या ॲप्लिकेशन वरून तुमचा अर्ज दुरुस्त करता येईल. अर्ज दुरुस्त करताना काळजीपूर्वक करा कारण अर्ज फक्त एकदाच अपडेट करता येतो. अर्ज दुरुस्त करण्याआधी आधार कार्ड आणि राशन कार्डच्या दोन्ही बाजूंचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवा.
अर्ज दुरुस्त कसा करावा याबद्दल अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहा….