Havaman news ; राज्यात आजही या जिल्ह्यात होनार आवकाळी पाऊस, मान्सून अपडेट 2024
पुढील काही तासात आणि रात्री (येत्या24 तासात) दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ…आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह (30-40 किमी प्रतीतास वेग) हलका ते मध्यम पाऊस पडन्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाड्यातील जालना, बिड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा (यल्लो अलर्ट) अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
ठाणे, मुंबई, रायगड तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.तर पुढील 2-3 दिवस राज्यातील तापमान वाढनार आसून उष्णतेची लाट येनार आसल्याचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
मान्सून अंदमानात 19 मे रोजी दाखल झाला आसून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 7 जुनआगोदर मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल आणि 12 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल अशी शक्यता आहे.