सोयाबीन खत व्यवस्थापन ; कमी खर्चात असे करा सोयाबीनचे खत नियोजन
सोयाबीन पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी सोयाबीन पिकाचे खत व्यवस्थापन कशा पध्दतीने केले पाहिजे, कोनते खत टाकायला पाहिजे, एकरी किती किलो खत दिले पाहिजे आणि अधी दिले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती आपण या पोष्टमध्ये पाहनार आहोत…
सोयाबीन पिकासाठी नत्र, स्फुरद, पालाश आणि सल्फर या चार अन्नद्रव्यांची गरज आसते सोबतंच काही सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि फवारणी च्या माध्यमातून वापरू शकतो. यात स्फुरद आणि पालाश जास्त प्रमाणात नत्र मध्यम प्रमाणात आणि सल्फर कमी प्रमाणात लागते…
अनेक शेतकऱ्यांना नत्र, स्फुरद, पालाश हि भाषा लवकर समजत नाही त्यामुळे आगदी सोप्या भाषेत आपण हि माहिती खाली पाहनार आहोत👇👇
सोयाबीनला खत कधी द्यावे..?
सोयाबीनचे पिक कमी कालावधीचे आसल्याने पेरणी करतानाच खत देनं आवश्यक आहे… फुलं,शेंगा लागल्यावर खतं देऊन त्याचा फायदा सोयाबीनला होत नाही त्यामुळे पेरणीबरोबरच खत द्यावे…
कोनते खत द्यावे आणि एकरी किती किलो द्यावे ?
खालीलपैकी कोनताही एक पर्याय शेतकरी निवड करु शकतात👇
(शेनखत आसल्यास शेनखत शेतात पसरुन घ्यावे)
1) 12-32-16 (एकरी 75-100 किलो + सल्फर 10 किलो)
2) 10-26-26 (एकरी 75-100 किलो + सल्फर 10 किलो)
3) 14-35-14 (एकरी 50-100 किलो + सल्फर 10 किलो)
4) सिंगल सुपर फाँस्फैट एकरी 150 – 200 किलो (यासोबतच सल्फर ची गरज नाही)
5) 20-20-0-13 (एकरी 75-100 किलो + पोट्याश 30 किलो)
(शेतखत टाकलेले आसेल तर खताची मात्रा कमी करू शकता)
वरीलपैकी कोनताही एक पर्याय शेतकऱ्यांनी निवडला तर सोयाबीन पिक निघेपर्यंत परत खत देन्याची गरज पडनार नाही आणि सोयाबीनचे भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल…
सोयाबीनचे भाव लक्षात घेता यापेक्षा कोनताही अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांनी करू नये, कंपन्या आणि दुकानदार शेतकऱ्यांना लुटायलाच बसलेल्या आहेत त्यामुळे महागडी खते शेतकऱ्यांनी खरेदी करू नये…यापेक्षा शेनखताचा वापर शेतकऱ्यांनी करावा