Monsoon update 2024 – मान्सुनबाबत महत्त्वाची अपडेट, 1 जूनपासून महाराष्ट्रात पाऊस सक्रीय
यंदा महाराष्ट्रात लवकर मान्सूनचा पाऊस दाखल होन्यास पोषक वातावरण तयार झालं आहे, त्यामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रात जोर धरेल अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.
मान्सून 22 मे रोजी अंदमानात दाखल झाला आसून अंदमानात तो चांगलाच सक्रिय झाला आहे. येत्या 30,31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होनार आसल्याची माहिती पंजाब डख यांनी दिली आहे.
Monsoon update 2024 – मान्सून महाराष्ट्रात या तारखेला..
मान्सून केरळमध्ये दाखल होताच 1 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होनार आहे.1,2,3 जूनदरम्यान महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडनार आहे.यंदा मान्सूनची प्रगती वेगानं होत आहे त्यामुळे 8 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात सगळीकडे हजेरी लावेल आणि पेरण्याही होतील अशी शक्यता पंजाबरावांनी व्यक्त केली आहे.
मान्सून रेंगाळनार..
मान्सून खरंतर अजून लवकर येनार होता मात्र एक बंगालच्या खाडीत चक्रीवादळ तयार होत आहे आणि या चक्रीवादळामुळे मान्सून थोडा रेंगाळनार आहे. तरीही 8 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होनार आहे.
पुढील 3 दिवस पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आवकाळी पावसाची शक्यता आहे तर विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पुर्वमोसमी पाऊस पडेल..मान्सून केरळात आल्यानंतर 1 ते 3 जूनदरम्यान राज्यात मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे – panjab dakh