Monsoon 2024 ; यंदा जूनमध्ये चांगला पाऊस होनार, रामचंद्र साबळे
रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; आज आणि उद्या (26, 27 मे रोजी) हवेचा दाब महाराष्ट्रात 1002 हेप्टापास्कल इतका कमी असेल आणि राजस्थान आणि काश्मीरमध्ये हवेचा दाब 992 ते 998 इतका कमी राहील त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात ताशी 25 ते 30 किमी वेगाने वारे वाहतील. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा बदलेल आणि दक्षिण पूर्वेकडून वारे वाहू लागतील.
पॅसिफिक महासागराचे पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान 26 अंश सेल्सिअस आहे, तर पेरूजवळ ते 18 अंश सेल्सिअस आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी असल्याने \’एल-निनो\’चा प्रभाव संपून ला-निनोचा प्रभाव सुरू झाल्याचे दिसून येत आहे अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे तर बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. त्यामुळे यंदा मान्सूनचा पाऊस सुरुवातीपासून चांगला बरसन्याची शक्यता आसल्याची माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस किती तारखेला ?
यंदा 31 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होईल आणि महाराष्ट्रात 7 जूनपर्यंत मान्सून हजेरी लावेल.तसेच 12 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होईल अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली आहे.