Imd monsoon news भारतीय हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना गोड बातमी, monsoon 2024
Imd monsoon news ; भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा दुसरा अंदाज जाहीर केला आहे, आणि या अंदाजात हवामान खात्याने शेतकऱ्यांना 3 आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत. पहिली बातमी जुनमधील पावसाची आहे, तर दुसरी बातमी यंदाच्या पावसाची आणि तीसरी बातमी मान्सूनच्या आगमनाची आहे… तीनही बातम्या सविस्तर आपण या पोष्टमध्ये पाहनार आहोत👇👇
यंदा देशात जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने जाहीर केला आहे. यात मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होनार आसल्याने जुन महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस बरसनार आहे. जूनमध्ये चांगला पाऊस बरसनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हि दिलासादायक बातमी आहे.
दुसरी आनंदाची बातमी म्हनजे यंदा देशासह महाराष्ट्रात चांगला पाऊस बरसनार आहे. पाँझीटीव्ह आयओडी आणि ला निनोमुळे देशात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता आहे. यात जूनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आसल्याने पेरण्या लवकर होउन उत्पादन चांगले मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांना हि खुशखबर म्हनावी लागेल.
Imd monsoon news यंदा मान्सून वेळेवर महाराष्ट्रात दाखल होनार आहे. पुढील 2 ते 3 दिवसात म्हनजे 31 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होनार आहे आणि महाराष्ट्रातही मान्सून वेळेवरच दाखल होईल अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मान्सून वेळेवर दाखल होनार आहे आणि जुनमध्ये म्हनजे सुरूवातीलाच चांगला बरसनार आसल्याने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे.
भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा सुधारीत अंदाज 27 मे रोजी जाहीर केला आहे.यात मान्सूनचं आगमन वेळेवर होनार आसून जूनमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने जाहीर केला आहे. तसेच यंदा देशासह महाराष्ट्रात चांगला पाऊस होनार आहे. सकारात्मक आयओडी आणि ला निनामुळे यंदा चांगल्या पाऊस होनार आहे.