मान्सून येत्या 24 तासात केरळमध्ये लावनार हजेरी, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील नागरिकांनाही उकाड्यापासून सुटका मिळेल अशी शक्यता आहे.आरबी समुद्रातून वारे वाहू लागल्याने तापमान घट अपेक्षित आहे अशी माहिती हवामान खात्याचे वरीष्ठ अधिकारी नरेश कुमार यांनी दिली.
महाराष्ट्रात मान्सून किती तारखेला ?
मान्सूनच्या केरळातील आगमनानंतर त्याच्या पुढील प्रवासाबद्दल अचुक अंदाज बांधता येतो.तरीही मान्सून केरळमध्ये वेळेवर दाखल होत आहे आणि महाराष्ट्रातही वेळेवरच दाखल होईल अशी शक्यता आहे.. साधारणपणे 8-10 जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
सध्या एलनिनो कमकुवत होत आसून ला निना स्थिती बळकट होन्यास सुरुवात झाली आहे. त्यातच यंदा सकारात्मक imd चांगला पाऊस घेऊन येनार आसल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आसून हि एक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी आहे.
मान्सून केरळात दाखल होन्याची सर्वसामान्य तारीख 1 जून आहे पण यंदाचा मान्सून 30 मे रोजीच केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता आहे. म्हनजेच 2 दिवस आधीच मान्सून केरळात हजेरी लावनार आहे. मान्सूनचा प्रवास वेगानं सुरू आसल्याने पुढील 24 तासात मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज imd कडून देन्यात आला आहे.