मान्सून केरळमध्ये दाखल, येत्या 7 दिवसात महाराष्ट्रात…Monsoon 2024
आज 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. वेळेआधीच मान्सून अंदमानात दाखल झाला होता, आता केरळातही मान्सून 2 दिवस आधीच दाखल झाला आहे.
पुढील 8 ते 10 दिवसात मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होईल अशी शक्यता आहे. 8 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात तर 10 जूनपर्यंत मुंबईत हजेरी लावेल असा अंदाज आहे.
मान्सून केरळमध्ये दाखल
मान्सून केरळमध्ये दाल झाला आसून केरळात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
मान्सून: अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप परिसर, केरळचा बहुतांश भाग, तामिळनाडूचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा उर्वरित भाग, NE BOB, NE भारताचा बहुतांश भाग नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा, मेघालयचा बहुतांश भागात आज दाखल झाला आहे.
पुढील 2-3 दिवसात लक्षद्वीप क्षेत्र आणि केरळ, कर्नाटकचे काही भाग, तामिळनाडूचे आणखी काही भाग, SW आणि मध्य BoB, NE BOB चे उर्वरित भाग आणि आसाम-मेघालय आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालचे काही भाग, सिक्कीम या भागात मान्सून दाखल होन्यास पोषक वातावरण आहे.
नैर्ऋत्य मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, आज 30 मे 2024
Southwest Monsoon has set in over Kerala, today the 30th May, 2024
IMD pic.twitter.com/2MNXQVmHUD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 30, 2024