Havaman andaj today ; यंदा मृग नक्षत्रात पेरणी होन्याचा अंदाज, पहा कधी ?
यंदा मृग नक्षत्रात पेरण्या होन्याची शक्यता वर्तवन्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हि अतीशय आनंदाची बातमी आहे. मृग नक्षत्रात पेरण्या झाल्यास उत्पादनात मोठी वाढ होते कारण वेळेवर पेरण्या झाल्यामुळे पिकाची चांगली वाढ होते आणि किड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
मान्सून यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला आसून महाराष्ट्रात (तळकोकणात) 7 जूनपर्यंत दाखल होईल अशी शक्यता आहे, तर 15 जूनआधी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल. यंदा मान्सून वेळेवर दाखल होत आहे त्यामुळे पेरण्या योग्य वेळी होऊन उत्पादनात वाढ शक्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हि खुशखबर म्हनता येईल.
Havaman andaj today – मृग नक्षत्रात पेरण्या शक्य
मृग नक्षत्रात म्हनजेच 15 जुनआगोदर पेरण्या होतील अशी माहिती व्हाईट गोल्ड ट्रस्ट चे संस्थापक गजानन जाधव यांनी दिली आहे.शेतकऱ्यांनी पेरणीपुर्वी बी-बियाणे, खते, तननाशके खरेदी करावी आणि मशागतीची कामे आवरून पेरणीसाठी तयार रहावे.
पेरणी करताना जमिनीत पेरणीयोग्य ओलावा आसेल तरंच पेरणी चा निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा.कमी ओलीवर पेरणी करु नये.पेरणी करण्याआधी बिजप्रक्रीया करावी आणि नंतरच पेरणी करावी.
पुढील 7 ते 8 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होन्यास पोषक स्थिती आसल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. तर 15 जुनआधी मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल असा अंदाज आहे.