Monsoon news today ; मान्सून कर्नाटकात दाखल, महाराष्ट्रात पावसाची शक्यता – के.एस होसाळीकर
Monsoon news today मान्सूनची वाटचाल वेगानं सुरू आसून आज 2 जून रोजी मान्सूनने संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू चा भाग व्यापुन टाकला आसून कर्नाटक आणि अंध्र प्रदेशातील काही भागात मजल मारली आहे. यामुळे पुढील 2-3 दिवसात मान्सून तळकोकणात दाखल होन्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Havaman today ; पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी ताशी) येण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे अशी माहिती के.एस होसाळीकर यांनी ट्विटरवरून दिली आहे.
आज विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजा, वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे आणि कोकणातील वातावरण उष्ण आणि दमट राहन्याची शक्यता आहे. तर पुढील 4-5 दिवसात राज्यात पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे.
30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला आसून आज 2 जून रोजी मान्सून कर्नाटक आणि अंध्र प्रदेशात पुढे सरकला आहे. तर पुढील 2-3 दिवसा संपूर्ण कर्नाटक, अंध्र प्रदेश तसेच तळकोकण या भागात मान्सून दाखल होन्यास अनुकूल आसल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.