खताचे भाव 2024 – रासायनिक खताची दरवाढ खरंच झाली का?
खताचे भाव 2024 ; रासायनिक खतांची दरवाढ खरंच झाली का ? खताचे भाव वाढल्याची बातमी खरी आहे कि अफवा याबाबत सविस्तर माहिती आपण या पोष्टमधून जानून घेनार आहोत.
खतांचे भाव वाढल्याची बातमी सध्या वायरल होत आहे.. झी 24 तास चँनलवर याबाबत बातमी दाखविन्यात आली तसेच लोकमत पेपरलासुद्धा याबाबत बातमी लावन्यात आली होती…आणि ही बातमी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वायरल झाली..
मात्र हि बातमी खोटी आहे… खतांच्या भावात कसलीही दरवाढ सध्या तर झालेली नाही. शेतकऱ्यांना वेड्यात काढन्याचं कि फसवणूक करन्याचं काम या न्युज चँनलवाल्यानी केलं आहे.
सध्या खरीप हंगामासाठी शेतकरी खतं खरेदी करत आहेत, मात्र या बातमीचा फायदा खत विक्रेते घेत आसल्याचं दिसून येत आहे… प्रत्यक्षात कोनतीही दरवाढ नसताना दुकानदाराकडून शेतकऱ्यांची लुट या बातमीमुळे होत आहे…
कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण अधिकारी विकास पाटील म्हनाले की…खत उद्योगाकडून आम्ही खात्री केली आहे,रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या नाहीत. विक्रेत्यांनी आणि ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. \’एमआरपी\’पेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास कारवाई केली जाईल.
खताचे भाव वाढल्याची फक्त एक अफवा आसून बातमी खरी आहे किंवा खोटी न तपासता छापली गेली आहे. शेतकऱ्यांनी जास्त दराने खते खरेदी करु नये,जास्त दराने दुकानदार खतं विकत आसेल तर त्याबद्दल तक्रार करावी…