रामचंद्र साबळे ; या जिल्ह्यात मुसळधार तर या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज…
रामचंद्र साबळे ; हवामान विभागाचे निवृत्त तज्ञ रामचंद्र साबळे यांनी 17/जून रोजी महाराष्ट्राचा साप्ताहिक हवामान अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात साबळे यांनी काही जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार तसेच काही जिल्ह्यात मध्यम ते हलका तर काही जिल्ह्यात अतिशय कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पाहुया रामचंद्र साबळे यांचा साप्ताहिक हवामान अंदाज.
मान्सुनची वाटचाल मंदावली असुन उत्तर महाराष्ट्राचा काही भाग तसेच विदर्भातील बराचसा भाग व्यापने अजून बाकी आहे. 15/जुन पर्यंत मान्सूनने जेवढा भाग व्यापायला हवा होता तेवढा व्यापला नाही. साबळे यांच्या माहितीनुसार 20 जुन जुन पर्यंत मध्य आणि उत्तर भारतात व्यापने अपेक्षीत आहे.
हे वाचा – नमो शेतकरी योजनेचा हप्ता पिएम किसान योजनेच्या हप्त्या सोबत मिळणार का
रामचंद्र साबळे यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे की यंदा महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. सध्याच्या स्थितीत कुठेही दुष्काळी परिस्थिती नसेल सर्वत्र धरणे तलाव भरतील फक्त वितरणात फरक असेल. बऱ्यासच्या भागात 96 ते 98 % पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
या आठवड्यात रामचंद्र साबळे यांनी खालील प्रमाणे पावसाचा अंदाज राहिल..
🔵 बुलडाणा, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी, वाशिम या जिल्ह्यात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
🔴 अकोला, अमरावती, बीड, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नाशिक, धाराशिव, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, वर्धा, यवतमाळ, भंडारा, ठाणे या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.
🟠 नगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, नागपूर, नंदुरबार, पालघर, सोलापूर या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/2BQtg391b5
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 17, 2024
उत्तर कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हल्का ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 17, 2024
हे वाचा – युरिया डीएपीची मागणी वाढली ; यूरिया डीएपी बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
युरिया डीएपी ची मागणी वाढली, राज्य सरकारचा मोठा निर्णय – अजित पवार